बी जे हायस्कूलचे अडथळे सोडविण्यासाठी माजी विद्यार्थ्याच्या नातवाचा पुढाकार

बी जे हायस्कूलचे अडथळे सोडविण्यासाठी माजी विद्यार्थ्याच्या नातवाचा पुढाकार
 ठाण्याच्या टेंभीनाक्यावरील ऐतिहासिक अशी ओळख असलेली बी जे हायस्कुल तब्बल ३२ वर्षा नंतर पुन्हा एकदा मुख्य वास्तूत सुरू झाली आहे. पण शाळा सुरू झाल्या नंतर सुद्धा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ते अडथळे सोडविण्यासाठी  त्या शाळेचे माजी विद्यार्थी असलेले एन टी केळकर यांच्या नातवाने म्हणजे आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच आमदार केळकर यांनी शनिवारी शाळेची पाहणी करत, त्या ते अडथळे सोडविण्याचे आश्वासन ही दिले आहे. टेंभीनाक्यावर १५० वर्षांची परंपरा असलेल्या बी.जे हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम १८७२ मध्ये केलेले होते. मूळ इंग्लिश स्कुल असलेली ही शाळा १४ ऑगस्ट १८८० मध्ये सर बैरामजी जीजीभाय ट्रस्टने रहते घर, जमीन आणि ८ हजार ५००  रुपये शाळेसाठी दानपत्र करून शासनासाठी अर्पण केली होती म्हणून या शाळेचे नाव बैरामजी जीजीभाय ठाणा हायस्कूल (बीजे हायस्कूल) करण्यात आले. १९८४ साली शाळा धोकादायक झाल्याने ही इमारत पाडण्यात आली.
तेंव्हापासून या कामाला निधीची तरतूद मिळत नसल्याने काम रखडले होते. त्या इमारतीच्या बांधकामाला २०१४ साली लागणाऱ्या सर्व परवानग्या महापालिकेकडून मिळाल्या. परंतु मधल्या काळात वास्तुविशारद व ठेकेदार यांच्या आडमुठेपणामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले नव्हते.बी जे हायस्कुल तब्बल ३२ वर्षा नंतर पुन्हा एकदा मुख्य वास्तूत सुरू झाली आहे. पण शाळा सुरू झाल्या नंतर सुद्धा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पूर्व परीक्षा द्यावी लागत असायची, त्या शाळेची झालेली दुरावस्था पाहवत नाही. शाळेत मुलांची कमी पट संख्या आहे, शाळेत पुरेसे शिक्षक नाहीत, शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी शिपाई नाही या व इतर समस्यांसंदर्भात आमदार संजय केळकर यांना माहिती मिळाली. त्यांनी शाळेला भेट देत, तेथील समस्या जाणून घेतल्या. एवढेच नाहीतर त्या लवकरातलवकर मार्गी लावण्याचे आश्वासन ही यावेळी आमदारांनी दिले. तर या शाळेचे आमदार संजय केळकर यांचे आजोबा एन टी केळकर हे माजी विद्यार्थी होते. त्यामुळे आपल्या या शाळेशी त्यांना जीवाला दिसून आला. या पाहणी दौऱ्याला जिल्हा परिषद उप शिक्षण अधिकारी ज्ञानदेव निपुरते, सर्व शिक्षण अभियंता कदम, माजी मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील, बी जे हायस्कुलचे मुख्याध्यापक बळीराम सपकाळे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे , राजेंद्र सूर्यवंशी , राजपूत , काळे बाई, पारसी ट्रस्टचे अध्यक्ष परसी कराणी, झरसिस उढणावाला , दारा वाडिया, एड, महेंद्र कोळसकर, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव उमेश वांद्रे, सद्स्य विद्देश मुरुडकर, रवींद्र देशमुख, रश्मी कानडे व माजी विद्यार्थी व पारसी ट्रस्टचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
First Published on: February 26, 2023 10:08 PM
Exit mobile version