परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सिंह यांच्याविरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांनी दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी दोन कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप शरद अग्रवाल यांनी केला आहे. कोपरी पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात शरद अग्रवाल यांच्याकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच जमिनी बळजबरीने नावावर करण्यात आल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्या सोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे, असे सहआरोपी आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक फुलपगारे करत आहेत.

परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवर कालच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवर करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्यामसुंदर अग्रवाल हा असून ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक आहे.

अग्रवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, पीआय नंदकुमार गोपाले, पोलीस अधिकारी संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पनामिया आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यातील २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

First Published on: July 24, 2021 3:15 AM
Exit mobile version