ठाण्यात चैत्र वासंतिक नवरात्रोत्सव देवीचे आगमन

ठाण्यात चैत्र वासंतिक नवरात्रोत्सव देवीचे आगमन

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या प्रारंभी देवीचे आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आले. या मिरवणुकीत देवीच्या आगमनासाठी ३०० हून अधिक पथक तसेच संपूर्ण ठाणे जिल्हयातून वारकरी सांप्रदायाचे वारकरी पथके, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझीमपथक, घोडेस्वार, मावळे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला अशी जय्यत तयारीत देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या होत्या.

या देवीच्या स्वागतासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनीही भक्तिपूर्वक देवीचे रथ ओढून स्वागत केले. यावेळी आयोजक तथा ठाण्याचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते अनिश गाढवे, युवसेना अधिकारी किरण जाधव, अर्जुनसिंग डाभी, माजी नगरसेवक मंदार विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला उपशहर संघटक कुंदा दळवी, विभाग संघटक अपूर्वा तेलवणे, नंदा कोथळे, उप विभाग संघटक राजेश्री सुर्वे, तसेच मेघा विचारे, पियाली आलेगावकर, वनिता कोळी तसेच ठाणे, नवीमुंबई व भाईंदर येथील माजी नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना, युवतीसेना आदी मान्यवर व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

First Published on: March 22, 2023 10:12 PM
Exit mobile version