भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; तरुण-तरुणी जागीच ठार

भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; तरुण-तरुणी जागीच ठार

भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; तरुण-तरुणी जागीच ठार

भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला रायते येथील वैष्णवी देवी मंदिर जवळ भीषण अपघात झाला होता. भरधाव दुचाकीने कथोरे यांच्या कारला धडक दिली होती. या अपघातातून आमदार किसन कथोरे बचावले आहे. परंतु, या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या तरूण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. कल्याण तालुक्यातील दहागावजवळ रविवारी रात्री ही घटना घडली होती. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने एका दुचाकीला समोरून जोरात धडक दिली होती. भरधाव वेगात असल्यामुळे दोन्ही वाहनांनी समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कथोरे यांच्या कारची एअर बॅग सुद्धा फुटली. कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा तालुक्यातील म्हसकळ येथे आयोजित केला होता. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर ते बदलापूर येथे निघाले होते. यावेळी दहागाव रस्त्यानं रायते गावाच्या दिशेने येत असताना वैष्णवी मंदिराच्या थोडे पुढे मोटारसायकलने येणाऱ्या दोन तरूणांच्या गाडीला आमदार किसन कथोरे यांच्या गाडीची जोरदार धडक बसली. यामध्ये हे दोघं जागीच ठार झाले.

अमित नंदकुमार सिंग असं या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत सिमरन सिंग नावाची तरुणी गंभीर जखमी झाली होती. दोघेही जण कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील रहिवासी होते. जखमी अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, रात्री उशिरा उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. तर या अपघातात आमदार कथोरे जखमी झाले आहेत. कथोरे यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाही – नाना पटोले

First Published on: December 14, 2020 12:20 PM
Exit mobile version