Lok Sabha 2024 : “काँग्रेसचा हात पाकिस्तानला साथ”; विजय वडेट्टीवारांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंकडून समाचार

Lok Sabha 2024 : “काँग्रेसचा हात पाकिस्तानला साथ”; विजय वडेट्टीवारांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंकडून समाचार

ठाणे : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी, “26/11च्या हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना कसाबने नाही तर, आरएसएसशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या. तर ही माहिती वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवली होती.” असे वादग्रस्त विधान केले. यानंतर राज्यभरात त्यांच्या या विधानाचा विरोध करण्यात आला. या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील त्या विधानाचा विरोध करत विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसवर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी, ‘विजय वडेट्टीवार यांचे डोके फिरले आहे. तर काँग्रेसचा हात हा पाकिस्तानसोबत आहे.’ असे म्हणत समाचार घेतला. (cm eknath shinde critisized congress leader vijay wadettiwar statement)

हेही वाचा : Lok Sabha 2024 : काँग्रेसची चिंता मिटली, नसीम खान करणार वर्षा गायकवाडांचा प्रचार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “26 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या हल्ल्यात 100हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. पण याचे दुःख काँग्रेसला अजिबात नाही. त्यावेळी त्यांना कसाबच्या अपमानाची चिंता होती. विजय वडेट्टीवार यांचे विधान हे दुर्दैवी असून ते शहिदांचा अपमान करणारे आहे. आपले देशाचे नागरिक त्यांनी केलेल्या या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाहीत.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त करत विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले की, “26/11चा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा या हल्ल्याचा बदला घेतला जाईल अशी अपेक्षा होती. पण त्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते.” असे म्हणत काँग्रेसला टोला लगावला. “उद्धव ठाकरे यांचे बोगस हिंदुत्व आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांना चांगलं धुतलं असतं. विजय वडेट्टीवार यांचे डोके फिरले आहे.”

हेही वाचा : Lok Sabha 2024 : प्रचार संपल्यानंतर बारामतीत गुंडाच्या वापरावरुन राजकारण; रोहित पवार – मिटकरी आमनेसामने

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “मोदींचे सरकार आल्यानंतर पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा पंतप्रधानांनी याचा सूड घेत सर्जिकल स्ट्राइक केला. पंतप्रधान मोदींनी दाखवून दिले की, भारत मजबूत आहे. काँग्रेस आणि राहुल गांधींना मते मागण्याचा अधिकार नाही. काँग्रेस हे पाकिस्तानकडे झुकलेले दिसते. त्यामुळे काँग्रेसची ही भूमिका देशाला परवडणारी नाही. जेव्हा जेव्हा काँग्रेसचा विजय होतो, तेव्हा तेव्हा पाकिस्तानमध्ये जल्लोष केला जातो. त्यामुळे काँग्रेसचा हात हा पाकिस्तानसोबत आहे, असे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही.”


Edited By : Abhijeet Jadhav

First Published on: May 6, 2024 7:10 PM
Exit mobile version