महावितरण संबधी आपत्कालीन स्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा

महावितरण संबधी आपत्कालीन स्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
  महावितरणच्या पेण मंडळाअंतर्गत पेण, अलिबाग, मुरुड, कर्जत, खालापूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा व पनवेल ग्रामीण भाग (पनवेल महानगरपालिका व तळोजा/ नेरे  क्षेत्र वगळून) या तालुक्यातील ठिकाणी  पावसाळ्यामध्ये वादळी वाऱ्यांने वीज तार तुटने, वीज खांब उन्मळून पडणे, रोहित्र कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. नागरिकांनी वीज यंत्रणेतील तुटलेल्या तारा, वीज खांबास स्पर्श करणे टाळावे. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. तसेच धोकादायक वीजयंत्रणेची सूचना तात्काळ नजीकच्या महावितरणाच्या कार्यालयास द्यावी. आपात्कालीन स्थितीत पेण मंडळातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीज यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे पावसाळा सुरु झाला कि, वीज यंत्रणेत तांत्रिक बिगाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून, आपात्कालीन स्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी संयम राखून महावितरणला  सहकार्य करावे. पेण मंडळाअंतर्गत नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.  पेण मंडळासाठी ९०२९१६५५१०, अलिबाग विभाग  (पेण, अलिबाग तालुके) करिता ७८७५७६५५४०, गोरेगाव विभागातील  (महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा )  तालुकेच्या ग्राहकांनी ७८७५७६५६४३, या क्रमांकावर  संपर्क साधावे. पनवेल महानगरपालिका व तळोजा / नेरे क्षेत्र वगळून पनवेल ग्रामीण विभाग (कर्जत, खालापूर ,पनवेल तालुके) करिता ७८७५७६२७५९ आणि रोहा विभाग (माणगाव, तळा, रोहा, सुधागड तालुके ) करिता ७८७५७६५९२६ नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आहेत. नागरिक व वीजग्राहक आपत्कालीन स्थितीत या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देऊ शकतात. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन विभाग, उपविभाग स्तरावर समन्वयासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत. शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२ व १९१२० अथवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या २४ तास सेवेत असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडितची तक्रार ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस्ड कॉल देवून नोदवण्याची सोय आहे.
First Published on: June 12, 2023 11:05 PM
Exit mobile version