टेंभीनाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात दूषित पाणी, नागरिक हैराण

टेंभीनाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात दूषित पाणी, नागरिक हैराण

टेंभीनाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उथळसर, कॅसलमील, गोकुळ नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कोर्ट नाका, पोलीस लाईन परिसरत आदी भागांना गेल्या आठ दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे तेथील नागरीकांना  पोट दुखणे, ताप येणे, उलट्या होणे, अतिसार असे गंभीर आजाराने आजारी पडू लागले आहेत. त्यातच दूषित पाण्याबाबत स्थानिक  महापालिकेच्या पाणी पुरवठा तक्रार केली. त्यानुसार ते पाणी कुठे येत याचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. मात्र ते अद्यापही स्पष्ट झाले नाही. परंतु ड्रेनेज लाईनमुळे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे जो पर्यंत लिकेज सापडत नाही, तो पर्यंत नळाचे पाणी न पिता बिस्लरीचे पाणी प्या, असे सांगत हात झटकले आहेत.

गेल्या दोन वर्षांपूर्वीच उथळसर नाका येथील कॅसल मिल सर्कल पर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण करून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्यांवर मधोमध ड्रेनेज लाईन असुन या लाईन मध्ये दुतर्फा अस्तित्वातील सोसायटी, रहिवाशी इमारती असून या इमारतींच्या ड्रेनेजचा प्रवाह सुरळीत होत होता. परंतू रस्ता काँक्रीटीकरण कामात बहुतांश ड्रेनेज लाईन चेंबरमध्ये सिमेंट पडल्याने चेबंरमधील नाली चोक अप झालेल्या आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून अथक परिश्रम करूनही ड्रेनेज लाईन मधील सिमेंट काँक्रीटचे थर साचल्याने क्लिअर करणे शक्य होत नसल्याचे दिसत आहे.  रस्ता कंत्राटदाराने ड्रेनेज लाईन चेंबर बांधकाम अर्धवट केले असुन केवळ विटांचे बांधकाम केले आहे. त्यावर प्लास्टर करणे अपेक्षित होते. परंतू  महापालिका संबंधित अधिकाऱ्यांच्या कामचुकार आणि दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीने या चेंबरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यातूनच स्वागत हॉटेल समोर चौकात चेंबरही ढासळले आहे. त्यामुळे संपूर्ण लाईन चोक अप झाली आहे. तर डेल्टा अव्हेन्यू समोर एक दोन चेंबर चे झाकण देखील काँक्रीटीकरणात गेल्याने ते ओपन करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.
एकूणच यामुळे ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उथळसर नाका ते कॅसल मिल सर्कल पर्यंतची सर्व ड्रेनेज लाईन चेंबरचे बांधकाम प्लास्टर करावे, सिमेंट काँक्रीटीकरण स्लॅब मध्ये अडकलेले चेंबर खुले करावे. अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

First Published on: August 16, 2023 10:41 PM
Exit mobile version