corona virus: ठाण्यात १५ मार्चपासून ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा बंद

corona virus: ठाण्यात १५ मार्चपासून ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा बंद

राज्यात शाळा सुरु होणार नाहीत, टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय

ठाणे जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही महिन्यापासून वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्याही वाढतानाचे चित्र आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील ५ वी ते ८ वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीत निर्णयाचे परिपत्रक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५वी ते ८वीच्या वर्गांसाठी, सर्व प्रकारच्या शाळा, आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे व सर्व आश्रमशाळा, तसेच समाजकल्याण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व शाळा १५ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणेत याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने नियमानुसार चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुणीही टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६०मधील कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने २०२० मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होताय त्यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये पूर्णत: बंद होत्या. मात्र जानेवारी अखेरीस रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्याने हटवण्यात आला. दरम्यान २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण आणि इतर भागातील ५वी ते १२वी पर्यंच्या सर्व शाळा महाविद्यालये, आश्रम शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

मात्र, मागील महिन्याभरापासून कोरोणाबाधितांची संख्या पून्हा वाढत असल्याने अनेक निर्बंध लावले जात आहेत. यातच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५वी ते ८वीच्या वर्गांसाठी, सर्व प्रकारच्या शाळा, आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे व सर्व आश्रमशाळा, तसेच समाजकल्याण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व शाळा १५ मार्च पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणेत याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

First Published on: March 10, 2021 10:24 PM
Exit mobile version