कल्याणमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल

कल्याणमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल

कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी कालीचरण महाराज यांच्या विरोधात कलम २९५ अ धर्माच्या आणि धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे, कलाम २९८ धार्मिक भावना दुखविण्याबाबत बोलणे, कलम १५३ दंगा घडवून आणण्यासाठी बेछूट चिथावणी देणे. ५०५ ब सार्वजनिक आगळीक होण्यास साधक विधाने करणे आदी गंभीर कलमा खाली गुन्हे दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे त्यांच्या सहका-यांनी या बाबत कोळसेवाडी पोलिस स्थानकात पत्र देऊन तक्रार दाखल केली होती.

महात्मा गांधींना शिवीगाळ करत नथुराम गोडसेचा जयजयकार करणाऱ्या कालीचरण महाराज यांना छत्तीसगडच्या पोलिसांनी अटक केली. पण आता यानंतर कालीचरण महाराजांचा कल्याणच्या कार्यक्रमातील आणखी काही व्हीडिओ आता समोर आले आहेत. समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणे केल्यामुळे कालीचरण महाराज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण याच कालीचरण महाराज यांनी कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस स्थानकच्या हद्दीतील साकेत कॉलेज येथे मागील वर्षी दहा डिसेंबर रोजी दोन  धर्मात तेढ निर्माण होईल असे  भाषण केले होते.

या बरोबर महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्या बद्दल अनुदगार काढले होते. या प्रकरणी नोवेल साळवे यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात  दोन दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती. या मुळे अखेर २५ दिवसानंतर या कालीचरणवर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांना मिळालेल्या तक्रारीहून गुन्हा दाखल केल्याने या कालीचरण महाराजांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. या वेळी केलेल्या भाषणात कालीचरण यांनी महात्मा गांधी, पंडीत नेहरू यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप साळवे यांनी तक्रारीत केलेला आहे. या शिवाय हिंदू, भारतमाता, देशातील सेक्युलारिझम, ख्रिश्चन, मुसलमान समुदाय याविषयीही त्यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी विधाने केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.  या बाबतचे पत्र कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आल्याचे साळवे यांनी म्हटले आहे.

First Published on: January 5, 2022 5:32 PM
Exit mobile version