कल्याण तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय हवे

कल्याण तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय हवे

कल्याण । कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय आणि क्रीडा मैदान निर्माण करण्याची मागणी कल्याण पंचायत समितीच्या सभापती अस्मिता जाधव आणि उपसभापती भरत गजानन गोंधळे यांनी मासिक बैठकीत केली. तशा प्रकारचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला असून हा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्याच्या सूचना गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना करण्यात आल्या आहेत.
कल्याण तालुक्याची सध्याची लोकसंख्या चार ते पाच लाखांच्या घरात गेली आहे. यासाठी केवळ एक गोवेली येथे ग्रामीण रुग्णालय आहे. यानंतर दहागाव, खडवली आणि निळजे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.परंतु रिक्त पदे आणि अनेक अडचणीमुळे ते असून नसल्यासारखे आहे.

तालुक्यातील काही मोजक्याच शाळा सोडल्यातर अनेक शाळांना मैदानच नाही. मैदाने असल्यास जिल्हा परिषद शाळेचा पट वाढण्यास मदत होईल. या सर्व गोष्टींचा विचार करुन तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणि क्रीडांगण साकारण्यात यावे अशी मागणी आहे. या मैदानासाठी गोवेली मानिवली येथील शासकिय जागेचा विचार करावा अशी विनंती उपसभापती भरत गोंधळे यांनी प्रशासनाला केली. पंचायत समितीतील मासिक बैठकीला सदस्य रमेश बांगर,पांडुरंग म्हात्रे, यशवंत दळवी, रेश्मा भोईर, दर्शना जाधव, भारती टेंभे,रंजना देशमुख, अनिता वाघचौरे , गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख,विस्तार अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

First Published on: November 22, 2022 10:18 PM
Exit mobile version