मोबाईलचा अतिवापर घातक – डॉ. लहाने

मोबाईलचा अतिवापर घातक – डॉ. लहाने

नेत्ररोगतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

ठाणे । मेंदूवर ताण पडू लागल्याने विविध आजार वाढू लागले आहेत, लोक गोष्ट विसरू लागले आहेत. मोबाईलचा अती वापर हृदय, डोळे, कान यांच्यासाठी घातक ठरत असल्याचे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले. ठाणे नगर वाचन मंदिर शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाचे उद्घाटन समारंभ पद्मश्री डॉ. लहाने यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ठाणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष केदार जोशी, संस्थेचे कार्यवाह हेमंतकुमार दिवेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

डॉ. लहाने पुढे म्हणाले विद्यार्थी जीवनात माझा वाचनालयाशी खूप संबंध आला. मात्र आता फार संपर्क राहिला नाही. मी एमबीबीएसला असताना मला पुस्तक घेणे शक्य नव्हते. मात्र तेव्हा वाचनालयात अभ्यास केल्याने मी एमबीबीएस झालो, अशी आठवण त्यांनी सांगितली. परीक्षेच्या काळात वाचनालय बंद होईपर्यंत मी तिथे बसून अभ्यास करत असे. अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला. वाचनालय ही ज्ञानमंदिर होती आहेत आणि उद्या देखील राहणार आहेत. आता आपल्यात बदल झाला आहे. वाचनालयाची जागा आता मोबाईलने घेतली आहे. आता काही माहिती हवी असल्यास आपण वाचनालय जाण्याऐवजी गुगलवर शोधतो. गुगलने आयुष्यातला संयम संपवला, आपला संयम अडीच मिनिटापर्यंतच राहिला आहे, असे लहाने यांनी सांगितले. त्यामुळे वाचनालयाने वाचक वाढवण्यासाठी आणि वाचनालयशी जोडून घेण्यासाठी अनोखे उपक्रम राबविण्याची गरज आहे. आपण पुस्तकांपासून लांब गेलो आहोत, असेही ते म्हणाले.

First Published on: April 16, 2024 10:18 PM
Exit mobile version