ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍याचा मृत्यू

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍याचा मृत्यू

भिवंडी तालुक्यातून मुंबई- बडोदरा हा महामार्ग जात असून त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदार असलेले गंगामाई कंट्रक्शन या कंपनीने रविवारी काम करून तेथील विद्युत पुरवठा सुरूच ठेवल्याने तो विद्युत पुरवठा पाण्यात उतरून त्या ठिकाणी आपल्या बकर्‍या घेऊन गेलेल्या शेतकर्‍याला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ गणपत पाटील (54) असे या मृत शेतकर्‍याचे नाव असून या घटनेने स्थानिक ग्रामस्थांकडून संताप व्यक्त जात आहे.

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातून मुंबई- बडोदरा महामार्ग जात असून या महामार्गाचे काम वज्रेश्वरी ते पुंडाच्या या दरम्यान गंगामाई कंट्रक्शन कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम करीत असताना त्या ठिकाणी सुरू केलेला विद्युत पुरवठा सुरूच ठेवल्याने आणि त्या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक अथवा कर्मचारी न ठेवल्याने रविवारी सायंकाळी शेतीतील काम उरकून बकर्‍या चरायला घेऊन गेले ते घरी परतलेच नाही.
रात्री उशिरापर्यंत रघुनाथ पाटील घरी न परतल्याने सकाळी शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह पाण्यामध्ये पडलेला आढळून आला. या बाबत गावकर्‍यांनी शोध घेतला असता त्या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्या जवळ रघुनाथ पाटील हे गेल्याने त्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे गावकर्‍यांना आढळून आले. आहे. रस्त्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी कोणत्या ही प्रकारची सुरक्षा व्यवस्था संबंधित ठेकेदार कंपनीकडून ठेवली जात नाही, असा आरोप करीत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

घटनास्थळी स्थानिक गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक दाखल होऊन त्यांनी या घटनेबाबत चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेस ठेकेदार जबाबदार असल्याने जोपर्यंत शासकीय अधिकारी घटनास्थळी येऊन नुकसान भरपाई देत नाहीत तोपर्यंत मृतदेहास हात लावू न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर शासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी आणि ठेकेदार यांनी वैयक्तिक नुकसान भरपाई देण्याचे लिहून दिल्या नंतर मृतदेह उत्तारिय तपासणी साठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात पाठवला. या अपघाताची नोंद गणेशपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रघुनाथ पाटील मृत रघुनाथ पाटील हे स्वतः मुंबई-बडोदरा महामार्ग मधील बाधित शेतकरी असून त्यांचे घर या रस्त्यामध्ये बाधित झाले आहे.परंतु त्यांचे पैसे चुकीने त्यांच्या दुसर्‍या भावाच्या नावे गेल्याने मागील तीन वर्षांपासून ते त्याचा पाठपुरावा करीत होते. मात्र अजूनही त्यांना पैसे मिळू शकले नाही आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.

First Published on: October 30, 2023 10:43 PM
Exit mobile version