भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरामध्ये यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरामध्ये यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरामध्ये एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. ही आग लागल्याने कारखान्याच्या आजू-बाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आग वेगाने पसरली.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरात यंत्रमाग कारखाना आहे. शुक्रवारी सकाळी अचानक या कारखान्यात आगीचा भडका उडाला. कापडाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे काही क्षणात आगीचे भीषण रूप पहायला मिळाले.

स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण, यश आले नाही. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. मात्र या कारखान्याला लागूनच रहिवासी परिसर असल्यामुळे एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम सुरू असून कारखान्यात आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.


दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार

First Published on: November 13, 2020 10:17 AM
Exit mobile version