पोलिसांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नाही- पालकमंत्री शंभूराज देसाई

पोलिसांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नाही- पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे । कायदा कायद्याचं काम करेल, पोलीस पोलिसांचे काम करतील, पोलिसांच्या कोणत्याही कार्यामध्ये सरकार किंवा सरकारचे कोणताही मंत्री हस्तक्षेप करत नाहीत, असे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ज्युपिटर रुग्णालयात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्तव्य केले.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महेश गायकवाड लवकरच यातून बरे होतील आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देतील असे शंभूराज देसाई म्हणाले.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी, महेश गायकवाड यांना फक्त पाहिलं त्यांच्याशी कोणताही संवाद साधला नाही. महेश गायकवाड यांच्यावर डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत, असे देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

First Published on: February 4, 2024 10:48 PM
Exit mobile version