ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी हेल्पलाईन

ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी हेल्पलाईन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ठाणे महापालिकेने नालेसफाईबाबत तक्रारी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी हेल्पलाईन ( क्रमांक 022 – 25399617) सुरू केली आहे. त्यावर ठाणेकर नालेसफाई बाबतचा प्रतिसाद नोंदवू शकतात, पालिका त्याची तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करेल, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी ठाणे शहरातील रस्ते आणि नाले सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजिनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम मॉल मागील नाला आणि ज्ञानसाधना महाविद्यालय येथील परब वाडीजवळील नाला, तसेच, महामार्गाखालील गटार व नवीन भुयारी मार्ग यांची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या दौर्‍यात, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, राम रेपाळे, हनुमंत जगदाळे, विकास रेपाळे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर सहभागी झाले होते.

First Published on: May 23, 2023 10:47 PM
Exit mobile version