सत्तासंघर्षाचा निकाल शेड्यूल टेन प्रमाणे आल्यास सरकार पडणार

सत्तासंघर्षाचा निकाल शेड्यूल टेन प्रमाणे आल्यास सरकार पडणार

महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित सत्ता संघर्षाचा निकाल हा उद्या लागणार असून यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होणार आहे. या सत्तासंघर्षाचा निकाल शेड्यूल टेन प्रमाणे आला तर हे सरकार पडणार असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. उल्हासनगरात एका कार्यक्रमानिमित्त जाताना नाना पटोले यांचे कल्याणमधील दुर्गाडी चौकात कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. यावेळी काँग्रेस नेते ब्रीज दत्त, कांचन कुलकर्णी, शकील खान, जपजीत सिंग, प्रवीण साळवे, पॉली आणि कांचन कुलकर्णी यांनी मोठय़ा प्रमाणात कार्यकत्र्यासोबत पटोले यांचे जंगी स्वागत करीत सत्कार केला. यावेळी नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सांगलीतील एका नीट परिक्षा केंद्रावर मुलींना कपडे उलटे करुन घालण्यास लावले या प्रश्नावर पटोले यांनी सांगितले की, महाराष्ट्रातल्या शिक्षण प्रणालीचे आणि सरकार यात जमीनआसमानचा फरक आहे. कोणीच कोणाचे ऐकत नाही. मुलींची शाळेत परिक्षेच्या नावाने छेडखानी चालली आहे. या घाणेरड्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सरकारने त्यात लक्ष घातले पाहिजे असे पटोले यांनी सांगितले. द केरला स्टोरी हा चित्रपट काल्पनिक कथा असून हे वस्तुस्थितीवर आधारीत नसल्याचे या चित्रपटाच्या निर्मात्याने कोर्टात सांगितले. मात्र काल्पनिक दाखवून धार्मिक आणि सामाजिक वाद निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहे. काश्मीर फाईल वेळीही भाजपने हेच काम केले. जनतेच्या मूळ प्रश्नाला बगल देण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दर दिवशी ७० महिला गायब केल्या जातात. हे कोणाचे रॅकेट आहे, ही अतिशय दुदैवी बाब आहे. डबल इंजिन सरकार ट्रबल इंजिन झाली का ? हा शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान केंद्र आणि राज्य सरकार करीत असल्याची टिका नाना पटोले यांनी केली. प्रदीप कुरुळकर हा हनी ट्रॅपमध्ये फसला आहे, असे कुठले शिक्षण आरएसएसमध्ये दिले असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: May 10, 2023 10:17 PM
Exit mobile version