दहावीमध्ये ‘हा’ विद्यार्थी सर्वच विषयात काठावर पास; ठाण्यामध्ये जोरदार चर्चा

दहावीमध्ये ‘हा’ विद्यार्थी सर्वच विषयात काठावर पास; ठाण्यामध्ये जोरदार चर्चा

ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (2 मे) जाहीर करण्यात आला. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावीच्या निकालात कोकण मंडळाने बाजी मारत सर्वाधिक टक्केवारी मिळवली आहे, तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच दहावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे. या परिक्षेत चांगल्या गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांची चर्चा होत असताना ठाण्याचा एक विद्यार्थी काठावर पास झाला आहे. (In 10th standard ‘this’ student passed in all subjects, Strong discussion in Thane)

विशाल कराड (Vishal Karad) या विद्यार्थ्यांने सर्वच विषयांत 35 टक्के गुण मिळवत दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सर्वच विषयात 35 गुण मिळाल्यामुळे ठाणे शहरात त्याची चर्चा होताना दिसत आहे. परंतु त्याची घरची परिस्थीत बेताची आहे. तो ठाण्याच्या उथळसर भागात दहा बाय दहाच्या खोलीत राहतो. उथळसर भागात राहणारा विशाल शिवाईनगर येथील शिवाई शाळेत शिकायला होता. वडील अशोक कराड रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकतात, तर विशालची आई ज्योती कराड या दिव्यांग असूनही घरकाम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यचाा प्रयत्न करतात. बेताची परिस्थितीत विशालने खूप शिकून त्याला मोठे व्हायचे आहे. आहे. दहावी परिक्षेत 35 टक्के गुण मिळाले  असले तरी प्रचंड मेहनत करून भविष्यात मॅकेनिकल इंजिनिअर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

विशाल कराड यांच्या आई-वडीलांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, त्याला 35 टक्के गुण मिळाले असले तरी त्याच्या यशात आम्ही आनंदी आहोत. विशालला 35 टक्के गुण मिळाल्यावर कसे वाटत आहे, असे विचारले असता तो म्हणाला की, मला ४० टक्क्यांची अपेक्षा होती, पण जे गुण मिळाले आहेत त्यात मी समाधानी आहे. निकाल लागल्यावर मी पास आहे का, हे पहिले तपासले असता सगळ्या विषयांत 35 टक्के मिळाल्याचे दिसले. पण पास झाल्यामुळे आम्ही सर्व या यशाने आनंद असल्याचे विशालने सांगितले.

सख्ख्या मावस भावंडांना दहावीच्या परीक्षेत समान गुण
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात शिकणाऱ्या सख्ख्या मावस भावांना दहावीच्या परीक्षेत समान गुण मिळाले आहेत. अंजनगाव येथील आरती प्रशांत कुचेकर व तिचा मावसभाऊ कुणाल सकट अशी या भावंडांची नावे आहेत. दोघांनाही एकूण 600 गुणांपैकी 303 असे सारखे गुण मिळाले असून 60.60 टक्क्यांनी दोघेही पास झाले आहेत.

First Published on: June 3, 2023 10:56 AM
Exit mobile version