नाशिकमध्ये ठाकरे गटाला शिंदे गटाचा धक्का

नाशिकमध्ये ठाकरे गटाला शिंदे गटाचा धक्का

नाशिकमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिंदे गटाने धक्का दिला आहे. नाशिक इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील 16 सरपंचासह सभापती, माजी नगरसेवक आणि महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी अशा 50 जणांनी रविवारी ठाण्यातील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक शिवसेना प्रवक्ते नरेशजी म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्क प्रमुख राजू आण्णा लवटे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदींच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला.

शिवसेनेत प्रवेश करण्याची नावे
महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ,माजी नगरसेविका अँड.श्यामला दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, महिला आघाडी शहर समन्वयक ज्योती देवरे,
माजी शिक्षण मंडळ सभापती व उप महानगर प्रमुख शशिकांत कोठुळे, उप महानगर प्रमुख शरद देवरे,उप विभाग प्रमुख कुमार पगारे, पिंटू शिंदे, विधानसभा संघटक पश्चिम अनिता पाटील, उप विभागप्रमुख आशा पाटील, शाखा प्रमुख सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश भार्गवे, नगरसेवक सुदाम डेमसे, सचिन भोसले, शिवा ताकाटे, योगेश बेलदार, आनंद फरताळे, रोशन शिंदे तसेच महिला संघटक नगरसेवक, 17 सरपंच, सभापती असे पदाधिकारी.

हे सरकार राज्याला पुढे नेणारे सरकार- मुख्यमंत्री
जाहीर प्रवेश करणार्‍यांचे स्वागत क आपल्या भागातील प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासित केले. त्याचबरोबर आपला विश्वासला तडा जाऊ देणार नाही. तसेच मुख्यमंत्री म्हणून आपण काम करत असलो तरी, तळागाळातील कार्यकर्त्यांशी माझी बांधिलकी आहे. एक कार्यकर्ता म्हणून ती जपण्याचा मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करतो आणि कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतो तर गेली अडीच वर्षे सगळे ठप्प आणि बंद होते. त्याला चालना दिली, हे सरकार राज्याला पुढे नेणारे सरकार आहे. सर्वांगीण विकास करणारे आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

First Published on: March 26, 2023 9:56 PM
Exit mobile version