नद्यांच्या संवर्धनासाठी केडीएमसीची जनजागृती

नद्यांच्या संवर्धनासाठी केडीएमसीची जनजागृती
कल्याण : नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस कृतीसाठी जागतिक आवाहन म्हणून काम करतो जो जगभरातील समुदायांना आपल्या जीवनात नद्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणाची मागणी करण्यासाठी एकत्र करतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा काळू नदी तसेच उल्हास नदी व अनेक तलाव आहेत. या सर्व जलाशय स्वच्छ तसेच संरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहेच परंतु  सर्व नागरिकांची सुद्धा आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गणेश उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्मित होतो. हे निर्माल्य जेव्हा मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये तसेच तलावांमध्ये विसर्जित करतो तेव्हा  जलाशय विद्रूप होण्याची शक्यता वाढते.  समस्या सोडवण्यासाठी महापालिका यंत्रणा व महापालिकेचे स्वच्छ्ता ब्रँड अँबेसिडर तसेच शहरातील विविध सार्वजनिक संस्था, शाळा तसेच महाविद्यालयातील पर्यावरण दूत या सर्वांच्या सहकार्यातून निर्माल्य संकल्प मोहीम राबविण्यात आली होती.
या मोहिमेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका घ.क.व्या विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, कल्याण विभागातील स्वच्छता ब्रँड अँबेसिडर डॉ. रुपिंदर कोर व त्यांच्यासोबत बिर्ला महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी यांनी संपूर्ण गणेश उत्सव काळात परिश्रम करून सर्व गणेशभक्तांनी विसर्जन स्थळी दिलेल्या निर्माल्याचे विघटन करून ते महापालिकेच्या खत प्रकल्पास पाठविले व त्याचे खत तयार करून नागरिकांना प्रदान करण्यात येते. निर्माल्य संकलन मोहिमेत भाग घेणाऱ्या या बिर्ला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे (पर्यावरण दूत) यांचे प्रशस्ती पत्र प्रदान करून सत्कार करण्यात आले. या वेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ब्रँड ॲम्बेसेडर  डॉ. रुपिंदर कौर मुर्जानी तसेच बिर्ला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संदेश जयाभाये यांच्या हस्ते पर्यावरण दूत यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांनी केलेल्या कामाची स्तुती करण्यात आली.
First Published on: March 18, 2024 10:45 PM
Exit mobile version