‘त्या’ घटनेनंतर महाविकास आघाडीकडून गिरनार मंदिरात दत्तगुरूंची महाआरती

‘त्या’ घटनेनंतर महाविकास आघाडीकडून गिरनार मंदिरात दत्तगुरूंची महाआरती

ठाणे : गिरनार पर्वतावर अतिक्रमण करून समाजकंटकांनी दत्तगुरूंचा अवमान केला. समाजकंटकांच्या या कृतीमुळे समस्त दत्त संप्रदाय संतप्त झाला असून, या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या ठाण्याच्या गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दत्तगुरूंची महाआरती करण्यात आली. (Maha Aarti of Dattaguru in Girnar temple by Mahavikas Aghadi after that incident)

यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी सांगितले की, गिरनार मंदिरात झालेला प्रकार हा निंदनीय असून, त्यामुळे दत्तगुरु भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्यासाठी समाजकंटकांकडून दत्तस्थानाला क्षती पोहचविण्यात आली असून, श्री दत्तगुरू महाराज त्यांना सद्बुद्धी देवो तसेच ज्यांनी कुणी हा निंदनीय प्रकार केला आहे. त्याच्यावर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.

हेही वाचा : या माणसाने देशाचं वाटोळं केलं; आव्हाडांच्या ट्वीटनंतर अण्णा हजारे उचलणार कठोर पाऊल

या महाआरतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, प्रफुल कांबळे, अर्बन सेल अध्यक्षा रचना वैद्य, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, असंघटीत कामगार सेलचे अध्यक्ष राजू चापले, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा प्रियांकाताई सोनार, विक्रांत घाग, दिगंबर लवटे, मयूर सारंग, संजीव दत्ता, समाधान माने, राजेश साटम, पप्पू अस्थाना, संजय पगारे, महिला पदाधिकारी माधुरी सोनार, स्मिता पारकर, शुभांगी कोलमकर, कांता गजमल, शुभांगी खेडकर, अनिता मोटे, रचना वैद्य, कल्पना नार्वेकर, सुजाता गायकवाड, विजया दामले, रेश्मा दामले, रेश्मा भानुशाली, लक्ष्मी पवार, सुमन राठोड, इंदू धुरे, राणी मलिंगा, मल्लिका पिल्ले, गौरी माने युवक पदाधिकारी कुणाल भोईर, संदीप ढकोलिया, आशिष वाघ, रोहित चापले, संदीप पवार, बुवा सुर्याराव आदी कार्यकर्ते, पदाधिकारी या आरतीमध्ये सहभागी झाले होते.

First Published on: October 5, 2023 11:04 PM
Exit mobile version