असंघटित कामगार, आदिवासींना प्रतिबंधक लस उपलब्ध करून घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

असंघटित कामगार, आदिवासींना प्रतिबंधक लस उपलब्ध करून घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

असंघटित कामगार, आदिवासींना प्रतिबंधक लस उपलब्ध करून घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

अंबरनाथ शहरातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नाका बांधकाम कामगार, एमआयडीसीतील कामगार, घरकाम करणारे कामगार तसेच आदिवासी बांधव यांना सामाजिक व आरोग्य सुरक्षा याकरिता त्यांना विभागवार ऑफलाईन नोंदणी करून कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.अंबरनाथचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आणि तहसीलदार जयराज देशमुख यांना हे लेखी निवेदन देण्यात आले असून यावेळी सदाशिव पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. “कोविड १९” या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना प्रतिबंधक लस ही सर्व लोकांकरिता ऑनलाइन नोंदणी करून लसीकरण चालू आहे.

मात्र असंघटित क्षेत्रातील कामगार हा देशातील सर्वात मोठा घटक असून सुद्धा या प्रक्रियेपासून लांब आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लसीकरणाकरिता ऑनलाइन नोंदणी करणे कामगारांना शक्य होत नाही, हा घटक अल्पशिक्षित असल्याने त्याला संगणक व स्मार्टफोन हाताळता येत नाही किंवा आर्थिक दुर्बलतेपोटी तो स्मार्टफोन बाळगू शकत नाही, सध्या पावसाळा सुरू होताना गवंडी, रंगारी, प्लंबर, मोलकरिण, मजूर, आदिवासी हे लोक प्रत्यक्ष लोकांच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांना कोरोना प्रादुर्भावाचा मोठा धोका आहे.

त्यामुळे या घटकास लसीकरणाला मुकावे लागत आहे याकरिता त्यांची ऑफलाईन नोंदणी करून लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, सरचिटणीस धनंजय सुर्वे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्ष पुनम शेलार, माजी नगरसेवक कबीर गायकवाड, ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार, युवती अध्यक्ष गौतमी सूर्यवंशी, भगवान महाजन, युवक जिल्हा उपाध्यक्ष आशुतोष पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: May 25, 2021 8:02 PM
Exit mobile version