ठाण्यात मलेरिया वाढतोय

ठाण्यात मलेरिया वाढतोय

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात डिसेंबर महिन्यात मलेरिया आणि चिकुनगुनिया या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. त्यातच एक डेंग्यूचा ही आढळून आल्याने शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत, यासाठी विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर आणि औषध फवारणी सुरु आहे. दरम्यान पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जावून पाण्याची तपासणी मोहीम ही जोरात राबवली जात आहे. याचदरम्यान काही कंटेनरमध्ये गप्पीमासे सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये डिसेंबर, २०२१ मध्ये डेंग्युचे २२ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  तसेच मलेरियाचे ७४ तर चिकुनगुनियाचे १४ संशयित रुग्ण पुढे आले होते. त्यानुसार ठामपा आरोग्य विभागाने शहरात गृहभेटी देवून तपासणी मोहीम हाती घेतली. डिसेंबर महिन्यात एकुण ३५ हजार ९०३ घरांची तपासणी करण्यात आली.

त्यापैकी १ हजार ७९३ घरे दुषित आढळून आली. तसेच एकुण ५३ हजार ४९३ कंटेनरची तपासणी केली असता त्यापैकी १ हजार ९३३ कंटेनर दूषित आढळून आले. यापैकी ४८९ दूषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले. तर १ हजार ४२७ दूषित कंटेनर रिकामे करून काही कंटेनरमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. याच दरम्यान महापालिका कार्यक्षेत्रात ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ७ ई-रिक्षा, ८ बोलेरो वाहनामार्फत दोन सत्रात २ हजार १६४ ठिकाणी औषध फवारणी आणि ४० धूर फवारणी हॅण्डमशीन व्दारे १७ हजार ०६८ ठिकाणी महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार धूर फवारणी करण्यात आली आहे.

First Published on: January 6, 2022 6:00 PM
Exit mobile version