जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या दररोज ५५ हजाराहून अधिक प्रवाशांना नाथजलचा थंडगार दिलासा

जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या दररोज ५५ हजाराहून अधिक प्रवाशांना नाथजलचा थंडगार दिलासा
उन्हाळी सुट्ट्या लागल्याने लालपरीने मामाच्या गावाला तसेच कौटुंबिक सहलीसाठी बहुतांश जण अजून ही ये जा करत आहेत. त्यातच यंदा अवकाळी पावसामुळे उष्णतेचा पारा चांगला वाढला. या वाढत्या उष्णतेने जीव कासावीस होत असताना, थंडगार पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो.  खास करून एसटी प्रवासादरम्यान पाहण्यास मिळत आहे. त्यातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लालपरीतून प्रवास करण्याची ‘तृष्णा’ भागविण्यासाठी प्रत्येक आगारात पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यातच एप्रिल महिन्यात ठाणे जिल्ह्यातील सात आगारातून सुमारे ५५ हजार लीटर पाणी दररोज लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची नाथजल तृष्णा भागवताना दिसत आहे. तर मार्च महिन्यात ३९ हजार इतके लीटर पाण्याच्या बाटल्यामधून पाणी प्रवासी पियाले. पण, मे महिन्यात हे प्रमाण एप्रिल पेक्षा निश्चित वाढलेली आहे,अशी माहिती एसटी विभाग सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्याच्या आठ आगारातून लांब ,मध्यम आणि शहरी आणि ग्रामीण भागात  लालपरी सुसाट धाव आहे. त्यातच शासनाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्या सवलत दिल्या आहेत. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढल्याने उत्पन्न ही वाढण्यास मदत होत असल्याचे दिसत आहे. कोरोना आणि संपाच्या कचाट्यातून बाहेर येऊ लालपरी सुसाट निघाली आहे. त्यातच उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेत, जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यातच काही वातानुकूलित बसेसमधून आरामदायी प्रवास सुरु असताना, सध्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या अंगातून घासाचा धारा वाहत आहेत. त्यातच घसा ही कोरडा होत असल्याने थंडगार पाणी पिऊन आपापली तृष्णा भागविताना प्रवासी दिसत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे,बोरिवली, कल्याण,भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि वाडा या आगारातून दिवसाला एक लिटर आणि अर्ध्या लीटरच्या बाटल्यांमधून ५४ हजार ८०० लीटर पाणी प्रवाश्यांच्या पोटात गेले आहे. यामध्ये सर्वाधिक पाणी कल्याण आगारातुन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या पोटात गेले आहे. यामध्ये एक लीटरच्या १९ हजार तर अर्ध्या लीटर च्या १० हजार ८०० बाटल्यांचा समावेश आहे. तर मार्च महिन्यात हे प्रमाण ३९ हजार ४०० लीटर इतकेच होत

जास्त किंमतीत बाटली विकल्यास होणार दंड
महामंडळाने प्रवाशांसाठी शुद्ध आणि थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एका कंपनीला ठेका दिला आहे. त्या कंपनीमार्फत माफकदरात पाणी उपलब्ध होत आहे. मात्र जास्त किंमतीत ती बाटली विकली जात असल्याची तक्रार येत आहेत. जर का ही बाब निदर्शनास आल्यास त्याबाबत आगारप्रमुखांशी संपर्क करावा. असे आवाहन संबंधित विभागाने केले. तर दोषीला ५०० ते १ हजार रुपये दंड होऊ शकतो.असे म्हटले आहे.

First Published on: May 29, 2023 10:20 PM
Exit mobile version