जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक झाले कोरोनामुक्त

जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक झाले कोरोनामुक्त

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. आतापर्यंत दोन लाख ५० हजार २०० जण उपचार घेऊन सुखरुप घरी परतले आहेत. यामध्ये घरी जाणारे सर्वाधिक ५९ हजार ६७७ रुग्ण हे कल्याण- डोंबिवलीतील आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या ही २ लाख ६० हजार ७२५ इतकी आहे. त्यामध्ये घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ही २ लाख ५० हजार २०० इतकी असून ६ हजार २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजच्या घडीला ४ हजार २८७ जण कोरोना बाधित आहेत. तर रविवारी जिल्ह्यात ५४७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच २९० जण घरी परतले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात सहा महापालिका आणि दोन नगरपरिषद असून ग्रामीण भाग आहे. यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवीमुंबईत सुरुवातीपासून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातच कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. तसेच सुरुवातीला या आजाराने दगावणाऱ्यांची संख्याही जास्त होती. मात्र ती काही दिवसांनी कमी करण्यात त्या- त्या स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसू लागल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

संस्था- रुग्ण संख्या- बरे होणारे रुग्ण -मृत्यू
ठामपा 61070-58529- 1380
केडीएमसी 61983- 59677- 1189
नवीमुंबई 54586- 52426- 1110
उल्हासनगर 11751- 11298- 0371
मीराभाईंदर 26786- 25561- 0802
भिवंडी 06757- 06376- 0354
अंबरनाथ 08701- 08313- 0315
बदलापूर 09683- 09404- 0125
ठाणे ग्रामीण 19408- 18672- 0592

 

First Published on: February 21, 2021 10:30 PM
Exit mobile version