भर पावसातही महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई कामाची पाहणी

भर पावसातही महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई कामाची पाहणी

भर पावसातही महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई कामाची पाहणी

सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी होवून ठाणे शहर लेव्हल २ मध्ये असले तरी देखील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करत उद्यापासून ९ ते १२ जून,२०२१ या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व अत्यावश्यक कामे करण्यात आली असून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही भर पावसात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ठाणेकर नागरिकांना आवाहन केले आहे.पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वंदना बस डेपो येथून नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली.

 

वंदना बस डेपो, शिवप्रसाद, आंबेडकरनगर, एम. एच. हायस्कूल, सिडको क्रीक रोड, सरस्वती स्कूल राबोडी, साकेत नाला, सह्याद्री नाला, दत्तवाडी तसेच शनिमंदिर साईनाथनगर आदी नाल्याची पाहणी केली. आवश्यक त्या ठिकाणी नाल्याची रुंदी वाढविणे, खोली वाढविणे, खाडीच्या मुखाजवळ नाले रुंद करणे तसेच कचरा व सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या.

 

या पाहणी दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष गटनेते नजीब मुल्ला, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती प्रियांका पाटील, उथळसर प्रभाग समिती अध्यक्षा वहिदा खान, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा वर्षा मोरे, नगरसेवक संजय वाघुले, सुधीर कोकाटे, सुहास देसाई, उमेश पाटील, गणेश कांबळे, नगरसेविका प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, अंकिता शिंदे, प्रमिला केणी,अपर्णा साळवी,अनिता गौरी, पूजा करसुळे,विजया लासे, मंगल कळंबे, आरती गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, नगर अभियंता रवींद्र खडताळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

First Published on: June 8, 2021 7:43 PM
Exit mobile version