कल्याणात नऊ लाखांचे दारुचे रसायन नष्ट

कल्याणात नऊ लाखांचे दारुचे रसायन नष्ट

द्वारली आणि माणेरे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. नवसागर मिश्रित तब्बल ४ हजार ५०० लिटर रसायन राज्य उत्पादन शुल्क भागाने नष्ट केले असून ९ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हा नष्ट करण्यात आला आहे.

कल्याण ग्रामीण मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या हातभट्या आहेत. त्यामुळे या हातभट्ट्या शोधण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर होते.  कल्याण आणि अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्रामीण परिसरात कारवाईला सुरुवात केली. याचवेळी गुप्त माहीतीद्वारा तर्फे त्यांना ग्रामीण भागातील द्वारली, माणेरे गावच्या शिवारात नवसागर मिश्रित रसायनाने दारू तयार करत असल्याचे समजले आणि त्यांनी घटनास्थळी धाड टाकली नवसागर मिश्रित रसायनाने भरलेले ड्रम उध्वस्त केले आहेत. यात तब्बल ४ हजार ५०० लिटर रसायन राज्य उत्पादन शुल्क भागाने नष्ट केले असून ९ लाख २९ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंबरनाथ विभागीय पोलीस निरीक्षक एस.एन. घुले, उप निरीक्षक कल्याण अंबरनाथ विभाग मालवे, दुय्यम निरीक्षक आर.आर.चोरट, जवान प्रमोद यशवंतराव,आर.एम.राठोड,कुणाल तडवी आणि सदानंद जाधव यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.

First Published on: January 13, 2022 9:41 PM
Exit mobile version