ठाण्यात शनिवारी Rave Partyवर पोलिसांकडून कारवाई; 95 जण ताब्यात

ठाण्यात शनिवारी Rave Partyवर पोलिसांकडून कारवाई; 95 जण ताब्यात

ठाणे : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. नवीव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेक पार्टीचे आयोजन केले जाते. यात ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांकडून केलेल्या रेव्ह पार्टीत 95 जणांवर ताब्यात घेतले आहे.

ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या खाडी किनारी एका निरजन स्थळी रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट दोन आणि युनिट पाच यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या धाडी टाकून 95 जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी धाडी टाकलेल्या रेव्ह पार्टीत 8,03,560 किंमतीचा चरस 70 ग्रॅम, एलएसडी 0.41 ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स 2.10 ग्रॅम, गांजा 200 ग्रॅम असे अंमली पदार्थ आणि मद्य सापडले. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईसाठी 90 पुरूष आणि 5 महिलांना ताब्यात घेण्याता आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून रेव्ह पार्टीत ताब्यात घेतलेल्यांवर एनडीपीएस अॅक्ट आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदयाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाण्यासंदर्भात CM Eknath Shinde स्पष्ट म्हणाले; “हा प्रकल्प…”

मुंबई ड्रग्ज फ्री करण्याचा आमची संकल्प

ठाण्यात रेव्ह पार्टी पोलिसांनी पडकली आहे, या प्रकरणी मुख्यमंत्री म्हणाले, “या प्रकरणी कारवाई झालेली असून यात पोलिसांना एमडी ड्रग्ज पकडले आहे. या रेव्ह पार्टीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ड्रग्ज फ्री करण्याचा आमची संकल्प आहे. मुंबई पोलिसांनी 5 हजार कोटीचे ड्रग्ज पकडले आहे. यामुळे विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या (मविआ) काळात काहीच पकडले जात नव्हते. त्यांच्या काळात ड्रग्ज का पकडत नव्हते? ते तुम्ही शोधले पाहिजे, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

First Published on: December 31, 2023 1:51 PM
Exit mobile version