सैनिक कल्याण विभागांतर्गत सरळसेवेतील गट-क पदांची होणार भरती

सैनिक कल्याण विभागांतर्गत सरळसेवेतील गट-क पदांची होणार भरती

ठाणे । सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यासाठी कल्याण संघटक-40, वसतिगृह अधीक्षक-17, कवायत प्रशिक्षक-01, शारिरिक प्रशिक्षण निदेशक-01 गट क या पदाकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून आणि वसतिगृह अधीक्षिका, गट-क-03 या पदाकरिता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणार्‍या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वरील पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. या परिक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असून पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून 03 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील,त्यानंतर ही वेबलिंक बंद होईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी कळविले आहे.

First Published on: February 15, 2024 10:38 PM
Exit mobile version