टिटवाळ्यात गावदेवी मित्र मंडळाकडून सार्वजनिक स्मशानभूमीची डागडुजी

टिटवाळ्यात गावदेवी मित्र मंडळाकडून सार्वजनिक स्मशानभूमीची डागडुजी

टिटवाळ्यातील स्मशानभूमीला समस्याने ग्रासले असल्याने अनेकदा अर्ज विनवण्या करूनही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तसेच स्थानिक माजी लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. स्मशानभूमीची झालेली दुरावस्थेला अखेर टिटवाळ्यातील गावदेवी मित्र मंडळाने स्वखर्चाने डागडुजी केली. टिटवाळ्यातील अनेक सामाजिक संघटनेने स्मशानभूमीच्या अवकळे बाबत पालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊन दुरुस्तीबाबत विनवण्या करण्यात आल्या होत्या. मात्र या स्मशानाचा अवस्थेला जैसे थे अवस्थेत ठेवण्यात आल्याने अंत्यविधीसाठी येणार्‍या नागरिकांची स्मशानात पडलेल्या खाच खळग्यांमुळे उभे राहणे मुश्किल होऊन बसले होते. तसेच स्मशानाच्या आजूबाजूला झालेल्या घाणीच्या साम्राज्याने तर कहरच केला आहे. टिटवाळा गावातील गावदेवी मित्र मंडळाने या कामी पुढाकार घेत दुरावस्थेत असलेल्या स्मशानात सिमेंट काँक्रिटीकरण करीत स्मशानभूमीत नागरिकांची होत असणारी हेळसांड मात्र स्वखर्चाने पूर्ण केली आहे.

एकीकडे मोठ्या प्रमाणात नागरी विकास कामांचा गवगवा केला जात असताना टिटवाळ्यातील स्मशानभूमीच्या दुरावस्थेकडे पालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने टिटवाळा परिसरात नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात असताना गावदेवी मित्र मंडळाने केलेल्या कामाचे मोठे कौतुकही नागरिकांकडून केले जात आहे. स्मशानभूमीच्या आजूबाजूला असलेली अस्वच्छता टाकण्यात आलेली घाण उगवलेले गवत व अन्य झाडाझुडपांनी व्यापून टाकलेल्या परिसर जेसीबी द्वारे उचलण्यात येऊन आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

First Published on: December 21, 2023 9:35 PM
Exit mobile version