कत्तलीसाठी नेल्या जाणार्‍या 15 बैलांची सुटका

कत्तलीसाठी नेल्या जाणार्‍या 15 बैलांची सुटका

कत्तलीसाठी 15 बैलांना ट्रक मध्ये निर्दयपणे कोंबून बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या ट्रक चालकाला शहापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. मुंबई – नाशिक महामार्गावर आसनगाव जवळ गस्त घालणार्‍या पोलिसांना चकमा देऊन निसटणार्‍या संशयित ट्रक चा पाठलाग करून चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ट्रक जप्त करण्यात आला असून बैलांची सुटका करण्यात आली आहे.

नाशिकहून मुंबईकडे जनावरे घेऊन जाणार असल्याची खबर शहापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहापूर पोलिसांनी महामार्गावर पाळत ठेवली होती. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणार्‍या संशयित ट्रक ला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र ट्रकचालक निसटल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत
मोठ्या शिताफीने ट्रक चालकाला ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये बैलांना निर्दयीपणे कोंबण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत अधिक चौकशी केली असता पशुसंवर्धन अधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रक चालक साजिद बेग याला अटक करण्यात आली आहे. ट्रक मध्ये निर्दयीपणे कोंबण्यात आलेल्या बैलांना भिवंडी येथील गोशाळेत नेऊन त्यांची सुटका करण्यात आली असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले.

First Published on: February 13, 2023 8:59 PM
Exit mobile version