शिवाजीनगर पोलिसांनी तिघांनाही ठोकल्या बेड्या

शिवाजीनगर पोलिसांनी तिघांनाही ठोकल्या बेड्या

अंबरनाथमध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथच्या जीआयपी डॅम परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास ही सामुहिक अत्याचाराची घटना घडली. या घटनेतील पीडित तरुणी ही कल्याणला राहणारी असून ती अंबरनाथमध्ये एका दुकानात काम करते. तिचा मित्र हनुमान हिलम हा रविवारी त्याचे मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांच्यासोबत जीआयपी डॅम परिसरात दारू पिण्यासाठी बसला होता. याचदरम्यान हनुमान याने पीडित तरुणीला फोन करून जीआयपी डॅम परिसरात बोलावून घेतले. यानंतर हनुमान याने अत्याचार केला.

हनुमान याने दुष्कर्म केल्यानंतर त्याचे मित्र विश्वास आणि जावेद यांनीही अत्याचार केला. या घटनेनंतर हादरलेल्या तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार केली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत या तिघांना तातडीने शोधून काढले आणि बेड्या ठोकल्या. या आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.

First Published on: January 4, 2022 7:54 PM
Exit mobile version