ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोराईड फवारणीला सुरुवात

ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोराईड फवारणीला सुरुवात

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांच्या सुचना

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोईडची मोठ्या प्रमाणात फवारणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा आणि सर्व पदाधिकारी यांच्याकडून फवारणी अधिक तीव्र करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने ५ पथकाच्या साहाय्याने ही फवारणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सर्व प्रभाग समितीमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरू असून ही मोहिम अधिक तीव्र आणि व्यापक करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा दिल्या आहेत.

या मोहिमेतंर्गत शुक्रवारी कळवा, उथळसर, नौपाडा- कोपरी, वागळे, लोकमान्य – सावरकरनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात कोव्हीड -१९ विषाणू नियंत्रणासाठी ५ टिम नव्याने स्थापन करुन सकाळी ७.०० वाजेपासून जंतुनाशक औषधाची युध्द पातळीवर फवारणी करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी ९ बोलेरो जीप ८ ट्रॅक्टर व ६ ई – रिक्षा वाहनातून स्प्रेईगं मशिन मधून ६० कर्मचाऱ्यां मार्फत विशेष फवारणी मोहिम हाती घेऊन जंतूनाशक फवारणी करण्यात आली. यामध्ये प्रमुख रस्ते, प्रतिबंधित क्षेत्रे, हाॅटस्पाॅटस् याबरोबरच संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली आहे. तसेच ९५ हॅण्ड पंपाने शहरात वेगवेगळ्या ईमारती व सार्वजनिक ठिकाणी फवारणी करणे देखील नियमित चालू आहे.यापुढेही शहरात औषध फवारणी सुरूच राहणार आहे.

First Published on: April 3, 2021 1:40 PM
Exit mobile version