सकाळी सात वाजतापासून आयुक्तांचा ‘वॉच’

सकाळी सात वाजतापासून आयुक्तांचा ‘वॉच’

महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्व सहाय्यक आयुक्तांनी रस्त्यांवर उतरून त्यांच्या प्रभाग समितीतंर्गत साफसफाई आणि अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरात फलक निष्काषणाच्या कार्यवाहीला गती दिली. स्वतः महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा सकाळी ७ वाजलेपासूनच विविध ठिकाणी फिरून काय कारवाई झाली याच्यावर ‘वॉच’ ठेवून होते.

गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्तांनी साफसफाई, अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सविरूद्ध कारवाईविरोधात अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व सहाय्यक आयुक्त आणि प्रभागस्तरिय यंत्रणांनी सकाळी ७ वाजलेपासूनच प्रभागामध्ये फिरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून महापालिकेची सर्व यंत्रणा रस्त्यांवर उतरूण प्रभागांमधील साफसफाई तसेच अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर्स आणि पोस्टर्स काढण्याचा कारवाई करीत होती. याचदरम्यान महापालिका आयुक्तांनी माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर आणि कळवा प्रभाग समितीतंर्गत कारवाईची पाहणी केली.

First Published on: March 25, 2022 9:23 PM
Exit mobile version