नागरिकांना कामातून समाधान कसे मिळेल हाच उद्देश – आयुक्त सौरभ राव

नागरिकांना कामातून समाधान कसे मिळेल हाच उद्देश – आयुक्त सौरभ राव

ठाणे । ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेचा आयुक्त पदाचा चार्ज घेतला. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्यांना पद सोपवले. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, ठाणे खूप महत्वाचे शहर आहे, ज्या ठिकाणी झपाट्याने विकास कामे वाढत आहेत, लोकसंख्या देखील जास्त आहे, तसेच विकासकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. प्रशासकीय अनुभवाच्या दृष्टीने मी हे शहर विकासाच्या दृष्टीने महत्वाचे करण्याकरता प्रयत्न करीन. नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन तसेच अतिक्रमण हा महत्वाचा विषय आहे. शहर विकासाच्या दृष्टीने अजून चांगले होईल तसेच एक महत्वाचा मुद्दा तयार करून, एक चांगले प्लॅन करून कामे करून पर्यावरण पूरक कामे करणार, सुंदर शहरात टेरेस गार्डन तसेच लहान उपक्रम कार्बन मुक्त शहर, माझी वसुंधरा, पंचतत्व यामध्ये शाळेची मुले देखील कसे सहभागी होतील ते पहायचे आहेत, नागरिकांच्या दृष्टीकोनातून सर्व चांगले प्रयत्न करेन. नागरिक देखील या परिसरातील चांगले आहेत. मीडिया देखील येथील चांगली आहे. सर्वांना सोबत घेऊन कामे करायची आहेत. आयुक्त अभिजित बंगर यांनी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले. सर्व कामे चांगले करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणार, भारत सरकारचा आग्रह असतो. ठाण्याचा विकास चांगल्या दृष्टीने नेण्याचा प्रयत्न करणार.

पुण्यात देखील चांगले कार्य केले आहे. मोठी महानगरपालिका असो किंवा लहान नगरपालिका असो या सर्व ठिकाणी कामे सारखीच असतात, यामध्ये एकच हेतू असतो की तो नागरिकांच्या विकासाचे समाधान करणे आवश्यक असते. आयुक्त म्हणून नागरिकांच्या समाधानाची पातळी कशी वाढवता येईल, याकडे माझे विशेष लक्ष असेल.
ठाणे खूप चांगले शहर होईल, असा मी अभ्यास केला आहे. जो पर्यंत फायनांशियल मदत कामाला येणार नाही, तो पर्यंत कामे देखील होत नसतात म्हणून फायनांशियल सुधारणा करून नवीन कामे करता येतील, याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत ग्रीन सिटी हवाई अड्डा तयार करण्याबद्दल अजून तरी मला काही माहिती नाही. पण नवीन प्रोजेक्ट आली तर नक्कीच ह्या योजना करता येतील, असे ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.

First Published on: March 22, 2024 10:00 PM
Exit mobile version