नाल्यासाठी खोदलेल्या खड्यात पडले म्हशीचे पारडे; सव्वा तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश

नाल्यासाठी खोदलेल्या खड्यात पडले म्हशीचे पारडे; सव्वा तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश

नाल्यासाठी खोदलेल्या खड्यात ५ महिन्यांचे म्हशीचे पारडे पडले;

ठाणे: साकेत रोडवरती नाल्याचे बांधकामाच्या कामाकरीता खोदण्यात आलेल्या अंदाजे ११ ते १२ फुट खड्यात अंदाजे ५ महिन्यांचे म्हशीचे मादी जातीचे पारडी पडल्याची घटना शनिवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या खड्यातून पारडाला एक ते सव्वा तासांनी बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. तर खड्यात पडलेल्या पारड्याच्या पोटाला व पाठीमागच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

कळवा ब्रीज जवळ,स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान समोर साकेत रोडवरती नाल्याचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाच्या कामाकरीता खोदण्यात आलेल्या खड्यात म्हशीचे पारडी पडलेली आहे, अशी माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राबोडी वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पडलेल्या अंदाजे ५ महिन्यांच्या पारडयाला बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १२ फुट खड्यात उतरून शर्थीचे प्रयत्न सुरू करत जवळपास एक ते सव्वा तासांनी त्या पारड्याला बाहेर काढले.

या खड्यात पडलेले पारडे हे राबोडीतील फुरकान कुरेशी यांच्या मालकीचे असून बाहेर काढल्यानंतर ते पारडे हे मालकाच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेत कोणतीही जीविहानी झाली नसली तरी, पारडी खड्यात पडल्यामुळे तिच्या पोटाला व पाठीमागच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


 

First Published on: April 30, 2022 4:31 PM
Exit mobile version