वाहतूक कोंडीचा भार वॉर्डनवरच

वाहतूक कोंडीचा भार वॉर्डनवरच

वाहतूक कोंडमारीतून सुटका करण्यासाठी कल्याण पूर्व पश्चिम शहर वाहतूक शाखेकडे तुटपुंजे वाहतूक नियंत्रण पोलीस कार्यरत असल्याची माहिती उजेडात आली आहे. या दोन्ही ठिकाणी कार्यरत असणार्‍या पोलीस बला पेक्षा वॉर्डन म्हणून नेमणूक असणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याची मदार एकंदरीत वॉर्डनवर असल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे.

कल्याण आरटीओचा कार्यभार कल्याण, डोंबिवली,टिटवाळा, खडवली ते बदलापूर,अंबरनाथ ते थेट मुरबाड पर्यंत कार्यरत असून ३१ लाखांवर वाहनांची नोंदी असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली. या संख्येत सर्वच प्रकारची वाहने येत आहेत. कल्याण वाहतूक शाखा पश्चिम येथे १ वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,३ पोलिस उपनिरीक्षक, ७ जमादार, १८ हवालदार, १० पोलीस नाईक, ८ पोलीस कॉन्स्टेबल, तर ४ महिला पोलिस वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याकरिता कार्यरत आहेत. यात केडीएमसीने ३८ तर एमएसआरडीसीने ५ असे एकूण ४३ वॉर्डन दिले आहेत. तर येथे पोलिसांची संख्या ४७ सांगण्यात आली आहे. यात ऑफिस कार्यालयात सात ते आठ कर्मचारी कामकाजासाठी कार्यरत असतात.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी वाहतूक शाखेत १ सीनिअर इन्स्पेक्टर, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ उपनिरीक्षक, ६ जमादार, ११हवालदार, ७ पोलीस नाईक ,५ पोलीस कॉन्स्टेबल,३ महिला पोलीस असे नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात असून केडीएमनसीने कोळसेवाडी वाहतूक शाखेला १९ तर एमएस आर डीसी ने ३७ असे एकूण ५६ वॉर्डन दिले आहेत. एकीकडे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीने शहर गजबजलेले असून वाहतूक शाखेकडे रस्त्यांवरील वाढत चाललेल्या वाहन संस्थेच्या दृष्टीने तुटपुंजी पोलीस बल कार्यरत असून खरी वाहतुकीची मदार या वॉर्डन वरच अवलंबून असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येत आहे.

First Published on: February 25, 2022 9:56 PM
Exit mobile version