शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्री

शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्री

गेल्या 10 वर्षात एकही दंगल नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापुरातून दावा

ठाणे । शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी, सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुुरुवारी केले. विद्या प्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळ यांच्या डी.एल.बी. डिग्री कॉलेजचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळणे, ही काळाची गरज आहे. शासन त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. ठाण्यात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. येत्या काळात ठाण्याचा सर्वांगीण विकास होणारच, विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणही होईल, याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी शिक्षण क्षेत्रातील 1972 साली पाहिलेले केजी टू पीजी हे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न निश्चित सफल होईल.
या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम, कम्प्युटर लॅब, ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय, कॉलेज प्लेसमेंट व करियर गाईडन्स सेंटर त्याचबरोबर विधी महाविद्यालय, मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय, अशी विविध महाविद्यालये सुरु होत आहेत. गरजूंना शिक्षण देण्याचे पुण्य काम या संस्थेतून होत आहे, असेच चांगले काम करीत राहा, शासन आपल्या पाठीशी निश्चित उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुप्रसिध्द आरजे अमित काकडे यांनी केले तर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

‘वृक्षवल्ली 2024’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन
ठाणे महानगरपालिकेच्यावीन ’वृक्षवल्ली 2024’ या 13 व्या भव्य अशा झाडे, फुले, फळे, भाजीपाला या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.00 वा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. सदरचे प्रदर्शन रेमंड रेस ट्रॅक, जे.के.ग्राम, पोखरण रोड नं. एक येथे आयोजित केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. या प्रदर्शनात कुंड्यामधील शोभिवंत पानांची झाडे (झुडपे), कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी (ऑर्कीडस), कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले, दांडीस (कट फ्लॉवर) इतर असे एकूण 22 विभाग व पोटविभाग आहेत. त्याचबरोबर शहरातील उद्याने व बागांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये लहान मोठ्या अशा एकूण 250 स्पर्धकांना भाग घेतला आहे. तसेच या प्रदर्शनात बागांची संबंधित वस्तू, उत्पादने, बांबूपासून तयार करण्यात आलेली शोभिवंत वस्तू इत्यादीचे जवळ जवळ 40 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. तीन दिवस सुरू असणार्‍या या प्रदर्शनास ठाणेकर नागरिकांना भेट द्यावी असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

First Published on: February 8, 2024 10:10 PM
Exit mobile version