शासन आपल्या दारी अंतर्गत नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करावे-आयुक्त

शासन आपल्या दारी अंतर्गत नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करावे-आयुक्त

महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार महिन्याच्या पहिल्या सोमवारी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका स्तरावर प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली तोकशाही दिनाचे आयोजन करण्यांत आते होते पाप्रसंगी उप-आयुक्त (आरोग्य) दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीमध्ये आयुक्त यांच्या तिस-या मजल्यावरील कॉफन्फरन्समध्ये संपन्न झाला. परंतू आजच्या लोकशाही दिनामध्ये एकही तक्रार नसल्याने शासन आपल्या दारी अंतर्गत व मनपाच्या विविध सेवांतर्गत नागरीकांच्या तक्रारीचे विहित मुदतीत निवारण करणे, त्यासाठी संबंधित विभागांनी वेगवेगळ्या योजनांतर्गत लाभार्थ्यांपर्यंत जनजागृती करुन ताभार्थ्यांची संख्या वाढविण्याबाबत त्यासंदर्भात विभागनिहाय एका कॅम्पचे आयोजन करणे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालिन यंत्रणा, शहरातील आपादग्रस्त किंवा पूर परिस्थिती, अनाधिकृत बांधकामे आणि धोकादायक, अतिधोकादायक इमारतीवर तात्काळ कार्यवाही करणे तसेच त्यातील नागरीकांच्या पुर्नवसनासंदर्भात आमंत्रा येथील एम.एम.आर.डी.ए.पांच्या इमारतीमध्ये त्यांच्यासाठी रेटल होसिंगच्या धर्तीवर त्यांचे भाडे तत्वाने पुनर्वसन करणे संबंधी, शहर सुशोभिकरण, स्वच्छ सर्वेक्षण कचरामुक्त शहर अशा विविध विषयसंदर्भात उपस्थित सर्व महानगरपालिका अधिका-यांची आढावा बैठक आयोजित करून, सदर लाभार्थाना कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणांवर लाभार्थ्यांना योजनांचे लाभ देण्याबाबत या आढावा बैठकी दरम्यान महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन करतांना सांगितले, शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी होऊ नये याकरीता प्रभाग स्तरावरून अतिधोकादायक, धोकादायक इमारतीवर शासन परिपत्रकानुसार तात्काळ कार्यवाही करणेचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

आयुक्त म्हसाळ पुढे म्हणाले की, धोकादायक, अतिधोकादायक इमारतींमधील बाधित नागरीकांना राहण्यासाठी भाडे तत्वावर आमंत्रा येथे व्यवस्था करण्यात यावी, तेथील आवश्यक सुविधा देणेत याव्यात, अशा सर्व बाधित नागरीकांना त्यांच्या या इमारतीवर कार्यवाही करण्यापूर्वी तशा नोटीसा निर्गमित कराव्यात आणि प्रभागनिहाय धोकादायक, अतिधोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट न करणा-यांचे स्ट्रक्चरल ऑडीट महापालिकेतर्फे करून त्यांची फी ही संबंधित इमारत मालक वा संबंधितांना घरपट्टीच्या बिलामध्ये नमूद करून वसुल केली जाणार असल्याने त्यांना तशा लेखी सुचना देणेबाबत शेवटी आयुक्त म्हसाळ यांनी सांगितले.  त्यानंतर आयुक्त म्हसाळ यांनी नागरीकांना आवाहन केले की, पुढील लोकशाही दिन हा ७ ऑगस्ट २०२३ रोजी होणार असून त्यासाठी निवेदनकर्त्यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज २० जुते २०२३ पर्यंत माहिती व जनसंपर्क विभागामध्ये सादर करावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत तसेच अर्जामध्ये एकच तक्रार असणे आवश्यक आहे असेही त्यांनी शेवटी आवाहन केले.

First Published on: July 3, 2023 11:02 PM
Exit mobile version