आंब्याचा ट्रक उलटला

आंब्याचा ट्रक उलटला

उत्तरप्रदेश येथून ठाणे घोडबंदर रोड मार्गे नवीमुंबई वाशी येथील एफएमसी मार्केटकडे निघालेला ट्रक वाघबील उड्डाणपुलावर चढताना उलटल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. यावेळी ट्रकमधील १२ टन केशरी आंबे होते ते सर्व आंबे रस्त्यावर पडले. या घटनेमुळे त्या वाघबील उड्डाणपूलपासून विजय गार्डन पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यावर तो रस्त्या वाहतुकीसाठी तासाभराने मोकळा झाला.याचदरम्यान वाहतूक धीम्यागतीने सुरू होती. तर सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती कासारवडवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांनी दिली. तर ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वाहतुक पोलिसांनी वर्तविण्यात येत आहे.

First Published on: June 22, 2023 11:16 PM
Exit mobile version