ठाणा कॉलेजजवळील रस्ता खचला

ठाणा कॉलेजजवळील रस्ता खचला

ठाणे महापालिकेमार्फत मलनिस्सारणाचे काम सुरू असल्याने खारटन रोड, ठाणा कॉलेजजवळील शितला माता चौकात रस्ता खचल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समोर आली. खचलेला रस्ता हा जवळपास 10 ते 15 फुट खोल आणि 20 ते 25 फूट लांब असा आहे. सुदैवाने या पडलेल्या भगदाडमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याने रात्री घरी परतणार्‍या ठाणेकर नागरिकांचे चांगले हाल झाले आहेत.
रस्ता खचल्याची बाब दक्ष नागरिक सचिन शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. माहिती मिळताच धाव घेतली. तसेच सुरक्षितेच्या दृष्टीने खबरदारी घेत, त्या रस्तावरून सुरू असलेली वाहतूक स्थानिक लोकांच्या मदतीने पूर्णपणे बंद करण्यात आली. ही घटना घडली त्यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मलनिस्सारणचे काम सुरु असल्याने तो रस्ता खचला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. हे काम सुरू असल्याने त्या रस्त्यावरील वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले होते. मात्र येत्या दोन ते चार दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. असेही महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

First Published on: March 28, 2023 10:25 PM
Exit mobile version