लोकल पकडण्याची घाई तरुणाच्या जीवावर बेतली

लोकल पकडण्याची घाई तरुणाच्या जीवावर बेतली

रेल्वे गाडी व फलाटातील अंतराकडे लक्ष द्या, अशा प्रकारची उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून दररोज करण्यात येत असते. मात्र काही प्रवाशी याकडे लक्ष देत नसल्याने त्यांच्यावर आपला जीव गमविण्या वेळ येते.घाईघाईत रेल्वे गाडी पकडण्याच्या नादात एका तरुणाचा चालत्या रेल्वे गाडी व फलाट मध्ये अडकून जागीच जीव गेल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकात घडली.

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, ओमकार नितीन बळे ( २३) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.डोंबिवली फलाट क्र.४ वर सकाळी ११.३३ वाजता कर्जत लोकल आली असल्याचे ओमकारने पाहिले.त्याला या लोकल मधून जायचे असल्याने ओमकारने रेल्वे पुलाच्या पायऱ्या उतरून घाई घाईत लोकल पकडल्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत लोकल सुरू झाल्याने ओमकारने डब्ब्यात जाण्यासाठी पाय टाकला असता दुर्दैवाने त्याचा अंदाज चुकला.त्याचा पाय फलाट व गाडीमधील मोकळ्या जागेत पडला. ओमकार या गॅपमध्ये अडकल्याने त्याला लोकलची धडक लागली. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

First Published on: February 16, 2023 11:00 PM
Exit mobile version