ठाण्यात जलवाहिनी फुटली हजारो लिटर पाणी वाया

ठाण्यात जलवाहिनी फुटली हजारो लिटर पाणी वाया

माजीवडा येथे मेट्रोचे काम सुरू असताना, एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. एअर वॉल फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले असून या जलवाहिणीवरील वागळे औद्योगिक वसाहतीतील ६०० ते ६५० ग्राहकांचा पाणी पुरवठा बंद झाला होता. तसेच पाणी पुरवठा सायंकाळी ६ वाजता पूर्वपत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका हद्दीत मेट्रो ४ चे काम सुरु असून माजिवडा जंक्शन परिसरात पायलिंगचे काम सुरु होते. हे काम सुरु असताना एमआयडीसीच्या ९०० मी.मी जलवाहिनीला धक्का लागल्याने या जलवाहिनीचा ६ इंचाचा एअर वॉल फुटला. त्यामुळे पाण्याचे उंच फवारे उडू लागले. घडलेल्या प्रकारची माहिती मिळताच एमआयडीसी आणि ठाणे महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु केले.

एमआयडीसीच्या माध्यमातून वागळे इंडस्ट्रियल परिसर, कळवा, विटावा आणि कोलशेत भागात पाणी पुरवठा होतो. मात्र या प्रकारानंतर केवळ वागळे पट्ट्यात दोन तास पाणी पुरवठा बंद असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.

First Published on: March 2, 2021 4:10 AM
Exit mobile version