बनावट सीम कार्ड विकणाऱ्या त्रिकुटास अटक

बनावट सीम कार्ड विकणाऱ्या त्रिकुटास अटक
मोबाईल सीम कार्ड खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे आधारकार्ड घेऊन त्यांना सीमकार्ड दिल्या नंतर त्याच आधारकार्डवर इतरांचे बनावट फोटो लावून चार ते पाच बनावट सीम कार्ड तयार करून देणाऱ्या त्रिकुटाला भोईवाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. या त्रिकुटाकडून विविध कंपन्यांचे तब्बल ३८८ मोबाईल सिम कार्ड जप्त करून जवळपास २ लाख २३ हजार १६२ रुपयांचा मुद्देमाल देखील पोलोसांनी जप्त केला आहे.
भोईवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिसांना धामणकर नाका आणि त्यानंतर नागाव गायत्री नगर रोड या दोन ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सिमकार्ड विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांना याबाबत महिती दिली असता पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुरेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी रमेश आतकरी, अरविंद गोरले, किशोर सूर्यवंशी, विजय कुंभार, विजय ताठे या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत बनावट सीम विकणाऱ्या सईद अब्दुल गफार शेख, मोहम्मद इरफान अन्सारी आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक या तिघांना ताब्यात घेत तपासणी केली. त्यांच्या जवळ वेगवेगळ्या आधारकार्डावर एकच फोटो वापरून वेगवेगळे नाव पत्ता लिहून आधारकार्डासोबत छेडछाड करीत त्याचा वापर नवे सीमकार्ड अॅक्टिवेट करून ते निरनिराळ्या ग्राहकांना विक्री करीत असल्याचे आढळून आले.  या त्रिकुटा कडून व्होडाफोन,जिओ कंपनीचे सीमकार्ड, आधारकार्डावर एकाच इसमाचे फोटो लावून वेगवेगळे क्रमांकांचे आणि नाव पत्यांचे तब्बल १५४ बनावट आधारकार्ड जवळ बाळगलेले आढळून आले आहेत.
एका वीज चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना दिलेल्या मोबाईल वर संपर्क साधला असता ते दुसऱ्यांचे असल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत संशय बळावल्याने या गुन्ह्याचा तपास करताना हे घबाड पोलिसांच्या हाती लागले असून एकच फोटो वेगवेगळ्या आधारकार्डा वर लावून नाव पत्ता बदलूनन हा प्रकार सुरु होता.
First Published on: January 21, 2022 9:50 PM
Exit mobile version