दादोजी कोंडदेव स्टेडियम परिसरातील वाहतुकीत ४ एप्रिलपर्यंत बदल

दादोजी कोंडदेव स्टेडियम परिसरातील वाहतुकीत ४ एप्रिलपर्यंत बदल

ठाणे शहरातील  सिडको क्रिक रोड, शितला माता चौक, दादोजी  कोंडदेव स्टेडियम येथील रस्त खचून मलनिसारण होल्स तुटल्याने त्याची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत ४ एप्रिल २०२३ पर्यंत बदल करण्यात आले असल्याची माहिती असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त एस एस बुरसे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक कळवा कडून व साकेत रोडने सिडको बसस्टॉपकडे जाणाऱ्या TMT. NMMT व सर्व प्रकारच्या खाजगी बसेसना क्रिक नाका येथे नो एण्ट्री  करण्यात येत आहे. तर या बसेस प्रवाशांना क्रिकनाका येथे सोडतील तसेच तेथूनच प्रवाशांना घेवून जातील. तर छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळवा कडून व साकेत रोडने सिडको बस स्टॉपकडे जाणाऱ्या दुवाकी, तीन चाकी चारचाकी वाहनांना शितलामाता चौक येथे प्रवेश बंदी घालण्यात आल्याने  ती वाहने माता रमाबाई चौक येथून उजवे वळण घेवून दादोजी कोंडदेव स्टेडियम समोरुन जवाहर बाग व ए वन फर्निचर मार्गे  पुढे जातील.

तसेच सिडको बस स्टॉप कडून ए-वन फर्निचर कडे व मुख्य बाजारपेठ कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शितलामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे . त्यामुळे ती वाहने शितलामाता चौक येथून डावे वळण घेवून राघोबा शंकर रोड मार्गे क्रमन करतील.  ए वन फर्निचर व राघोबा शंकर रोड कडून सिडको बस स्टॉपकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना माता रमाबाई चौक येथे प्रवेश बंदी केल्याने ती वाहने जवाहर बाग, अग्निशामक केंद्र येथून उजवे वळण घेवून राघोबा शंकर रोड मार्गे  इच्छित स्थळी जातील.  ही वाहतुक अधिसूचना ०४ एप्रिल २०२३ पर्यंत अंमलात राहील, ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कोरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू पाहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त एस एस बुरसे यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: March 30, 2023 10:43 PM
Exit mobile version