कल्याण-डोंबिवलीत म्युकोरमायकोसिसचे दोन बळी

कल्याण-डोंबिवलीत म्युकोरमायकोसिसचे दोन बळी

कोरोना संसर्गा पेक्षा अधिक भयानक व प्राणघातक असलेल्या म्युकोर माय कोसिसचे दोन रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळून आले असून या रोगाची लागण झाल्याने या दोघांचा या घटनेत मृत्यू पावल्याची घटना घडल्याने येथे प्रचंड खळबळ माजली आहे. कोरोना रुग्णांवर हा आजार जडला जात असून डोंबिवलीतील बाजीराव काटकर व कल्याण ग्रामीण भागातील तुकाराम भोईर यांना ‌म्युकोर माय कोसिसची लागण झाल्याने डोंबिवलीत एका खासगी रुग्णालयात ते म्युकोर माय कोसिसने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात सध्याच्या घडीला सहा रुग्ण संशयित असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली. कोरोणा पेक्षा घातक ठरला जाणारा म्युकोर माय कोसिस हा रोग आता ग्रामीण क्षेत्रातून शहराकडे आगेकूच करू लागल्याने शहरवासीयांन मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे राज्यात प्रथमच या रोगाने दोन बळींची नोंद केल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्युकोर माय कोसिस या रोगाचा आजार गंभीर स्वरूपाचा मानला जात आहे. यात रुग्ण जिवंत राहण्याची शक्यता फार कमी असते. हा आजार एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे फैलावण्याची दाट शक्यता वैद्यकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

म्युकोरमायकोसिस एक फंगल इन्फेक्शन

म्युकोरमायकोसिस हा एक दुर्मिळ फंगल इन्फेक्शन चा प्रकार मानला जात असून त्यात संबंधित रुग्णांना रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते व कोरोणा संसर्गातून मुक्त झाल्यानंतर मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हा आजार हानिकारक ठरवतोय. तोंडाच्या एका बाजूला सूज येणे ,डोकेदुखी सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही प्रामुख्याने लक्षणे आढळतात. या आजाराचे सायनस मधून संक्रमण सुरू होत तोंडाच्या आतून वरचा जबडा ,डोळा ,मेंदू पर्यंत पोहचतो . डोळा कायमचा निकामी होतो तर अर्धांगवायू तसेच मृत्यूही ओढवण्याची शक्यता असते.

First Published on: May 11, 2021 9:35 PM
Exit mobile version