पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

कुटुंबातील सर्व सदस्य टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये बसले असता घरातील एक वर्षाचा चिमुकला खेळत असताना तो बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  ही घटना भिवंडी शहरातील देव नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी  भोईवाडा  पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिलकैश अन्सारी वय ( 1)  वर्ष असे या दुर्दैवी चिमुरड्याचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिलकैश हा भिवंडीतील देव नगर भागातील एका घरात कुटुंबासह राहत होता. घटनेच्या वेळी मृत चिमुकल्याची  आई रात्रीचे किचन मध्ये  जेवण तयार करीत  होती. त्यांची इतर  मुले घरात हॉल मध्ये बसून टीव्ही बघत  होती.  त्यावेळी खेळता खेळता चिमुरडा बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादलीत जाऊन पडला, त्यातच या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.  मृत दिलकैश अन्सारी याचे 6 भावंडे असून तो सर्वात लहान होता.  या प्रकरणी मृतक ची आई शबाना अन्सारी ( 29 ) यांच्या माहितीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून  पोलिसांनी तपास सुरू केला. आता पोलीस  तपास अंती नेमकी घटना कशी घडली याचे सत्य समोर येणार आहे. तर दुसरीकडे लहान चिमुरड्यांवर मातापित्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे हेच या घटनांवरून दिसून येत आहे.

First Published on: January 3, 2022 7:36 PM
Exit mobile version