ठाण्यात १५ ठिकाणी लसीकरण सुरू

ठाण्यात १५ ठिकाणी लसीकरण सुरू

Corona Vaccination: मुंबईकरांचा लसीकरणाला प्रतिसाद, काल ६९ हजार ५७७ मुंबईकारांनी घेतली लस

केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक आणि ज्यांची नोंदणी झालेली नाही असे आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. शहरात 15 ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून सकाळी १२ ते संध्याकाळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केंद्रे सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली.

महापालिकेच्या एकूण 15 ठिकाणी लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

यामध्ये दादोजी कोंडादेव स्टेडियम येथील आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, ग्लोबल कोविड हॅास्पीटल, साकेत, कळवा आरोग्य केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, घोडबंदर रोड, किसननगर आरोग्य केंद्र, लोकमान्यनगर आरोग्य केंद्र, पोस्ट कोविड सेंटर, माजिवडा, वर्तकनगर आरोग्य केंद्र, शीळ आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्नी केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर आरोग्य केंद्र, गांधीनगर आरोग्य केंद्र आणि कौसा आरोग्य केंद्र आदी ठिकाणांचा समावेश आहे. कोणत्याही केंद्रावर जाण्यापूर्वी लाभार्थीं कोविन अ‍ॅप, आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी करू शकतात. त्याप्रमाणे त्यांना लसीकरणासाठी स्लॉट देण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

First Published on: March 1, 2021 8:51 PM
Exit mobile version