पाणी टंचाईवर विंधन विहिरीचा उतारा

पाणी टंचाईवर विंधन विहिरीचा उतारा

धरणाचा जिल्हा म्हणून टेंभा मिळविणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षी पाणी टंचाई ही पाचवीला पुजलेली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने आणखी नाविन्यपूर्ण योजना म्हणजे विंधन विहिरींवर विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ – २३ या वर्षी ३३० विंधन विहारीना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यातच अवघ्या ३६ विंधन विहिरींच्या खोदकामे पूर्ण झाल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळेल असेच दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. ही बाब लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने ऑक्टोंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत पाणी टंचाईग्रस्त गाव पाड्यांवरील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येत असतो. त्यानुसार यंदाच्या वर्षी देखील पाणी टंचाई आरखडा तयार करण्यात आला असून यामध्ये ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या निवारण्यासाठी विंधन विहिरींवर विशेष भर देण्यात येत असतो.

दरम्यान, ऑक्टोंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीसाठी ३३० विंधन विहिरींना मंजुरी देण्यात  आली. त्यापैकी ३९ विहिरींचे खोदकाम पूर्णं झाले असल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. तर,  १६ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले असून ३ ठिकाणी विहिरींचे काम अयशस्वी झाले आहे. तसेच ७ ठिकाणी हातपंप देखील बसविण्यात असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. तर, शहापूर तालुक्यातील एका ठिकाणी ६० फुटापेक्षा अधिक खोल खोदकाम काम करावे लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी टंचाई आराखड्याच्या माध्यामतून विंधन विहिरींच्या कामांना गती देण्यात येत आहे. असे असले तरी, ६० मीटर पेक्षा जास्त खोलीकरण करायचे झाल्यास भूजल सर्वेक्षण विभागाच्या शिफारसी नंतरच प्रांत अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असते. ही प्रक्रिया वेळ खावू असल्यामुळे अनेकदा विंधन विहिरींच्या खोदकामास विलंब होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

First Published on: June 6, 2023 10:37 PM
Exit mobile version