तेलंगणात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, राज्यात १३ करोनाग्रस्त!

तेलंगणात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, राज्यात १३ करोनाग्रस्त!

कोरोना व्हायरस

देशभरात पसरत चाललेल्या करोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशभरात करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालाली आहे. त्यामुळे नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणामध्येही करोनाचे रूग्ण आढळले आहेत. सरकरच्या माहितीनुसार बुधवारी तेलंगणामध्ये आणखी ७ रूग्णांची भर पडली आहे. डिरेक्टर ऑफ पब्लिक हेल्थने हे रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं आहे. हे सात जण इंडोनेशियावरून आले असल्याचं समजतं. त्यामुळे आता तेलंगणात करोनाग्रस्तांची संख्या १३ वर पोहचली आहे.

तेलंगणा सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे सात जण इंडोनेशिया वरून आले होते. या रूग्णांना १६ मार्च पासून संशयित म्हणून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. १८ मार्च रोजी या सातही जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे सात जण १३ मार्च रोजी दिल्लीहून  कोच नंबर S9 ने आध्रं प्रदेश संपर्क क्रांती ट्रेनने रामगुदम असा प्रवास करत होते. तेलंगणा आरोग्य विभागाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या महितीनुसार बुधवार पासून त्या ७ रूग्णांसोबत प्रवास करणाऱ्या ट्रेनमधील प्रवास करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

याच महिन्यात ४ करोनाग्रस्त रूग्ण समोर आले आहेत. यातील पहिला रूग्ण २ मार्च रोजी दुबईहून परत आला होता. त्याचप्रमाणे बाकीचे ३ रूग्ण ही करोनाग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. पाचवा रूग्ण हा इंडोनेशियातचा नागरिक होता. तेलंगणा आरोग्य विभागाने आतापर्यंत ४७७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील ४१२ नमुने हे निगेटिव्ह घोषित करण्यात आले.तर बुधवारी हैद्राबाद विमानतळावर ७०,५४५ लोकांची चाचणी करण्यात आली आहे.

First Published on: March 19, 2020 1:36 PM
Exit mobile version