करोना अपडेट – राज्यात करोनाचा आता दोनच संशयित रुग्ण

करोना अपडेट – राज्यात करोनाचा आता दोनच संशयित रुग्ण

‘करोना’व्हायरस

राज्यात करोना विषाणूचे आढळलेल्या ४१ संशयित प्रवाशांपैकी ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आता एक संशयित प्रवासी निरीक्षणाखाली असल्याचा अहवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तर, मुंबई विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली दाखल असलेल्या ४१ पैकी ३९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पुणे, मुंबई येथे प्रत्येकी एक जण दाखल आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिल्लीत आढळले तीन संशयित –

दरम्यान, करोनाने भारतात प्रवेश केला असून दिल्लीत ही ३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये या तिघांवरही उपचार सुरू आहेत. ३ संशयितांपैकी २ चीनी नागरिक आहेत. हे दोन चीनी नागरीकांचं वय ३९ असून ते जानेवारी महिन्यात भारतात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत भारतामध्ये कोरोना व्हायरसचे ३ रुग्ण आढळले आहेत. हे तिघंही केरळमधील आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात बाधित भागातून १७३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ९० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात बुधवारपर्यंत ४१ जणांना भरती करण्यात आले होते. त्यामध्ये मंगळवारी संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर एकाला मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ४० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता नेगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन.आय.व्ही पुणे यांनी दिला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होईल. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन येथून येणा-या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांकरता करण्यात येतो आहे.

First Published on: February 12, 2020 10:09 PM
Exit mobile version